January 6, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा राजकीय

श्री राम मंदीराचा पायाभरणी समारंभ दिवाळी सणाप्रमाणे साजरा करावा – आ.आकाश फुंडकर

खामगांव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे प्रभु श्री राम जन्म स्थळी भव्य मंदीराचा पाया भरणी समारंभ बुधवार दि. 05 ऑगस्ट रोजी थाटात संपन्न होत आंहे. अयोध्येत राम जन्मस्थळी भव्य मंदिर व्हावे हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न होते. ते शेकडो वर्षानंतर साकार होत आहे. एक प्रदिर्घ लढा सफल झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे या लढयात मोठे योगदान आहे. या राम मदीर आंदोलनात आपल्या पैकी अनेक सर्वसामान्य नागरीक व कार्यकर्ते सक्रीय सहभागी झाले होते. त्यामुळे हा आपल्या आयुष्यातील एक ऐतिहासिक दिवस आहे. जिल्हयातील सर्व प्रभु श्री राम भक्त सर्वसामान्य नागरीकांना, भारतीय जनता पार्टी, बुलढाणा पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तसेच माझे आवाहन आहे की, हा दिवस आपण सर्वांनी वैयक्तीक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. आपण हा ऐतिहासिक क्षण भव्य प्रमाणात साजरा करत असतांना कोरोनाच्या साथीचे भान ठेवायला हवे आणि त्यामुळेच आपण सामुहिक उत्सव करु नये.
माझे आपणा सर्वांना आवाहन आहे की, दि.5 ऑगस्ट रोजी सर्वांनी घरावर रोषणाई करावी. घरा घरावर प्रभु श्रीरामाचे फलक, भगवे झेंडे, गुढी उभारावी, दिवाळीप्रमाणे आकाश कंदील लावावा, घरांवर रोषणाई करावी, घरासमोर पणत्या लावाव्यात आणि रांगोळी काढावी. तसेच घरी आवर्जून गोड-धोड पदार्थ करावेत. घरामध्ये सर्व कुटूंबीयांच्या सोबत टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पहावा. आपण वैयक्तीक पातळीवर केलेल्या उत्सवाचे फोटो सोशल मिडीयावर प्रसिध्द करुन आपल्या ‍मित्रांसोबत आंनंद ‍ व्दिगुणीत करावा.
वरील प्रमाणे आनंदोत्सव साजरा करतांना सर्वांनी कोरोना साथीमुळे असलेले निर्बंध जसे मास्क वापरणे,फिजीकल डिस्टंन्सिग पाळणे इत्यादीचे पालन काटेकोरपणे करावे.
तरी जिल्हाभरातील सर्व सामान्य नागरीक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हया पत्राव्दारे आवाहन करण्यात येते की, श्री राम जन्म स्थळी प्रभू श्रीरामाचे भव्य मंदीराचे पायाभरणी समारंभाचा उत्सव वरील प्रमाणे स्थानिक स्तरावर साजरा करण्यात यावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आ.ॲड.आकाश फुंडकर यांनी केले आहे.

Related posts

एस टी बस व ४०७ ची समोरा समोर धडक ; एकाचा मृत्यु तर १६ जखमी

nirbhid swarajya

दबावाखाली येऊन इसमाची विष घेऊन आत्महत्या; तिघां विरुद्ध गुन्हा दाखल..

nirbhid swarajya

शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या 

nirbhid swarajya
error: Content is protected !!