21 रूग्णांची कोरोनावर मात
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 358 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 307 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 51 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 43 व रॅपिड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 84 तर रॅपिड टेस्टमधील 223 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 307 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा: मच्छी ले आऊट 1 पुरुष, जोहर नगर 1 पुरुष, विष्णूवाडी 1 महिला, 1 पुरुष, चांडोळ ता. बुलडाणा : 1 पुरुष, दे. राजा : अहिंसा मार्ग 1 महिला, लोणार: 2 पुरुष, खामगाव: सिंधी कॉलनी 1 पुरुष, इंदिरा नगर 1 पुरुष, शितला माता मंदिराजवळ 1 पुरुष, गौरक्षण रोड 2 महिला, 1 पुरुष, उदासी मठ 1 पुरुष, जगदंबा रोड 1 महिला, मोची गल्ली 1 महिला, डी पी रोड 1 महिला, 1 पुरुष, शेगाव: आरोग्य कॉलनी 1 पुरुष, वडनेर भोलजी ता. नांदुरा: 1 पुरुष, चांदूर बिस्वा ता. नांदुरा: 5 पुरूष, 3 महिला, धानोरा खुर्द तां. नांदुरा : 1 महिला, 4 पुरुष, नांदुरा: सिंधी कॉलनी 2 पुरुष, 2 महिला, मारवाडी गल्ली 1 पुरुष, केशव अर्बन बँकेचे जवळ 1 महिला, 1 पुरुष, नार्गेज भवन जवळ 1 पुरुष, जानेफळ ता. मेहकर: 1महिला, दाताळा ता. मलकापूर: 1 पुरुष, बोरखेडी ता. मोताळा 1 पुरुष, बावणबीर ता. संग्रामपूर : 1 पुरुष, 1 महिला, वरवट बकाल ता. संग्रामपूर: 1 पुरुष, साखरखेरडा ता. सिंदखेड राजा: 1 पुरुष, दिवठाणा ता. चिखली: 1 पुरुष, मूळ पत्ता पारध ता. भोकरदन जि. जालना: 1 महिला संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 51 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 21 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : नांदुरा: 2 पुरुष, आळंद ता. दे. राजा: 1 महिला, लोणार: 1 पुरुष, धाड ता. बुलडाणा: 1 पुरुष, दिवठाना : 1 महिला, चिखली: माळीपुरा 1 पुरुष, ब्रह्मपुरी ता. चिखली: 1 पुरुष, सुलतानपूर ता. लोणार: 4 पुरुष, 1 महिला, पिंपळगाव राजा ता. खामगाव: 1 महिला, खामगाव: महावीर चौक 3 पुरुष, करवीर कॉलनी 1 पुरुष, मेहकर:1 महिला, साखरखेरडा ता. सिंदखेड राजा: 1 पुरुष, खरबडी ता. मोताळा 1 पुरुष.
तसेच आजपर्यंत 9529 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 851 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 851 आहे.
आज रोजी 191 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 9529 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1399 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 851 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 518 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 30 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.