January 4, 2025
खामगाव जिल्हा बुलडाणा राजकीय शेतकरी

दुध उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या तिघाडी सरकारचा ‍निषेध- आ.फुंडकर

खामगांव : आज जिल्हयाभरात तसेच खामगांव शहर व तालुक्यात आमदार ॲड आकाश फुंडकर जिल्हाध्यक्ष भाजपा यांच्या मार्गदर्शनात दुध दरवाढ व अनुदानासाठी दुध वाटप हे अनोखे आंदोलन करण्यात आले. राज्यातील तिघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात सर्व जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. जनतेला राज्यातील नाकर्त्या सरकारने काहीच मदत केली नाही. राज्यातील दुध उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात दुधाला सरसकट प्रती लिटर ५ रुपये अनुदान व दुध भुकटी निर्यातीस अनुदान दिले होते. आता तर दुधाचे दर त्यापेक्षाही खालावले आहेत. मात्र आपल्या नाकर्त्या सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडून दिले असून कुंभकर्णी झोपेत हे सरकार आहे हया सरकारचा जाहीर निषेध आहे.
आज दुध दरवाढ व अनुदानासाठी दुध वितरण आंदोलन भाजपा व मित्रपक्षाच्या वतीने करीत आले. हे आंदोलन करतांना निश्चितच दुध उत्पादक शेतकऱ्यावरील अन्याय दूर झाला पाहिजे आणि गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १० रुपये अनुदान देण्यात यावे व दुध भुकटी निर्यातीला प्रती किलो ५० रुपये अनुदान देण्यात यावे, दुध खरेदीचा दर प्रती लिटर ३० रुपये करण्यात यावा हया मागण्यासाठी दुध वितरण हे अनोखे आंदोलन भाजपाचे वतीने आज खामगांव मधे करण्यात आले. दुध हे अमुल्य असून त्याची रस्त्यावर नासाडी करणे हा त्या दुधाचा अपमान आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज खामगांव शहर व तालुक्यात गोर गरीब जनतेला दुध वाटप करण्यात येऊन शासनाचा निषेध करण्यात आला.
भाजपाच्या वतीने आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात हे अनोखे आंदोलन करण्यात आले. हयावेळी बोलतांना आमदार आकाश फुंडकर म्हणाले की, सर्वांचे प्रेरणास्थान अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभीवादन करुन भाजपाच्यावतीने महायल्गार आंदोलन करण्यात आले. तिघाडी सरकारने राज्याची बिघाडी केली आहे. हया कुंभकर्णी झोपेत असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी भाजपाच्यावतीने हे महायल्गार आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात दुध दरवाढी साठी दुधाला दिलेले अनुदान व इतर आवश्यक उपाय योजनांचा राज्यातील तिघाडी सरकार करणे अमलात आणाव्या व तात्काळ दुध उत्पादक शेतक-याच्या दुधाला प्रति लिटर सरसकट १० रु व दुध भुकटीला प्रतिकिला ५० रु अनुदान देण्यात यावे अन्यथा भारतीय जनता पार्टी हे आंदोलन अधिक तिव्र करुन हया तिघाडी सरकारला दुध उत्पादक शेतक-यांच्या दुधाला भाव मिळविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असेही आ. फुंडकर यांनी सांगितले.

Related posts

कार व दुचाकिचा अपघात 3 जण गंभीर जखमी,

nirbhid swarajya

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार

nirbhid swarajya

तात्पुरते कारागृहातून फरार आरोपीला पोलिसांनी केली अटक

nirbhid swarajya
error: Content is protected !!