४३ रूग्णांची कोरोनावर मात
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५८० अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ५२१ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ५९ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३५ व रॅपिड टेस्टमधील २४ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून २५० तर रॅपिड टेस्टमधील २७१ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ५२१ अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : डोणगाव ता. मेहकर: २ पुरुष, मेहकर: २ पुरुष, १ महिला, बालाजी नगर १ महिला, वारूडी ता सिंदखेड राजा: १ पुरुष, सागवान ता. बुलडाणा: १ पुरुष, दाताळा ता. मलकापुर: २ पुरुष, खरबडी ता. मोताळा: १ पुरुष, नांदुरा: विठ्ठल मंदिराजवळ १ पुरुष, आठवडी बाजार १ पुरुष, चांदुर बिस्वा ता. नांदुरा: १ पुरुष, मोतीपुरा १ पुरुष, जामा मस्जिद जवळ २ पुरुष, मारवाडी गल्ली २ पुरुष, मिलिंद नगर १ महिला, वरवट बकाल ता. संग्रामपुर: १ पुरुष, पातुर्डा तालुका संग्रामपुर: १ पुरुष व १ महिला, माकोडी ता. मोताळा: २ पुरुष, २ महिला, अंचरवाडी ता. चिखली: ३ पुरुष, १ महिला, खामगाव: बालाजी प्लॉट २ महिला, १ पुरुष, बुलडाणा: १ पुरुष, येळगाव ता. बुलडाणा: १ पुरुष, लकडगंज १ महिला, १ पुरुष, आठवडी बाजार १ पुरुष, शेगाव: भैरव चौक १ महिला, १ पुरुष, ब्राह्मणवाडा २ पुरुष, साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा: २ पुरुष, २ महिला, जामोद ता. जळगाव जामोद: १महिला, दे. राजा : शिवाजीनगर १ पुरुष, बस स्थानकाजवळ २ पुरुष, सिविल कॉलनी १ पुरुष, मूळ पत्ता किन्ही ताठे तालुका जाफराबाद, जि. जालना: १ पुरुष, असोला, ता. दे. राजा: ३ पुरुष, ३ महिला व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात ५९ रूग्ण आढळले आहे. तसेच आज उपचारादरम्यान देशमुख प्लॉट, खामगाव येथील ७२ वर्षीय पुरूष रूग्णाचा खामगांव कोविड केअर सेंटर येथे मृत्यू झाला आहे.
तसेच आज ४३ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : अंजनी ता. मेहकर : २ महिला,१ पुरुष, खामगाव: भुसारी गल्ली १ महिला, नांदुरा: नांदुरा खुर्द: १ पुरुष, चिखली: ४ महिला, १ पुरुष, गांधी नगर १ पुरुष, माळीपुरा १ महिला, आदर्श स्कूल जवळ १ मुलगा, केशवनगर १ पुरुष, पिंपळगाव राजा ता. खामगाव: ३ महिला, २ पुरुष, लोणी गवळी, ता. मेहकर: ४ पुरुष, ४ महिला, डोणगाव ता. मेहकर: १ पुरुष, मेहकर: १ पुरुष, खामगाव: देशमुख प्लॉट २ पुरुष, ३ महिला, सुटाळा २ पुरुष, २ महिला, फरशी १ पुरुष, पुरवार गल्ली २ महिला, महावीर चौक २ पुरुष.
तसेच आजपर्यंत ८९१५ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ७८७ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ७८७ आहे.
आज रोजी २१० नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ८९१५ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १२६८ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ७८७ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ४५१ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ३० कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.