April 11, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

तहसीलदार साहेब तुमच्या राज्यात चालले तरी क़ाय…?

खामगांव : शहरात अवैध रेती मोठ्या प्रमाणावर येत
असून लाकडाऊन संचारबंदीच्या काळातही रात्रीच्यावेळी रेती माफीया दलालांचा मुक्त संचार होत आहे. रेती तस्करीला महसुल विभागाकडून आळा घालण्यासाठी मुसक्या आवळणे कठीण असल्याचे दिसून येत आहे.
अवैध रेती वाहतुक करणारे रेती माफिया तहसीलदार यांच्या बंगल्या बाहेर रात्रभर उभे असतात, तर काही वाड़ी, नांदुरा रोड वरील वेगवेगळ्या जागेवर पहरा देत असतात. या रेती माफियांवर महसुल विभाग अर्थपुर्ण दुर्लक्ष करत असून यांच्या सहकार्याने रात्री 9 वाजेपासुनच अवैध रेती वाहतुकीचे 10 ते 15 गाड्या रोज शहरामधे रेती वाहतुक करतात.जर एखादी गाडी पकडलीच तर चिरिमिरी घेऊन प्रकरण दाबण्यात येते. एकंदरीतच रेती तस्करी करणाऱ्या सोबत तहसीलदार व तहसील विभागाची फार मोठी अर्थपूर्ण साखळी असल्याचे या प्रकारावरुन दिसून येत असल्याची चर्चा नागरिकांमधे होत आहे.

Related posts

राहुल गांधी श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेणार…

nirbhid swarajya

शिवाजीनगर पोलिसांनी गुटखा पकडला

nirbhid swarajya

खामगांवचे आमदार कोरोना पॉजिटिव्ह ; स्वतः सोशल मीडिया वरून दिली माहिती

nirbhid swarajya
error: Content is protected !!