November 20, 2025
जिल्हा नांदुरा बुलडाणा शिक्षण

विद्यार्थिनीने मिळवले १०० पैकी १०० गुण

मोताळा : मनात इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची जिद्द असेल तर कोणतेही काम अशक्य नाही. हेच दाखवून दिले आहे बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील चंचल नावाच्या विद्यार्थिनीने..

कोरोनामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला इयत्ता दहावीचा निकाल आज २९ जून रोजी जाहीर झाला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा निकाल 96.10 टक्के लागला असून अमरावती विभागातून बुलडाणा जिल्हा प्रथम आला आहे. मुलांचा 95.18, तर मुलींचा 97.24 टक्के एवढा निकाल लागला आहे. यात स्व. बबनराव देशपांडे विद्यालयातील विद्यार्थिनी चंचल विजयराव देशमुख या विद्यार्थिनीने चक्क १०० % एवढे गुण मिळवले आहेत. चंचल चे वडील शेती काम करत असून त्यांचे साधे राहणीमान आहे. यातही तिने अभ्यासात अथक परिश्रम घेऊन आकाशाला गवसनी घालण्याचे नैत्रदीप काम केले आहे. तिला मिळालेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related posts

भेंडवळ घटमांडणी ला कोणताही शास्त्रीय आधार नाही- रघुनाथ कौलकार

nirbhid swarajya

खामगाव-जालनाच्या फील्ड सर्वे साठी रेल्वेचे अधिकारी बुलडाणा, जालन्यात दाखल

nirbhid swarajya

जीवनावश्यक दुकानांची वेळेमधे बदल

nirbhid swarajya
error: Content is protected !!