January 1, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 304 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 33 पॉझिटिव्ह

9 रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 337 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 304 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 33 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपिड टेस्टमधील 18 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 35 तर रॅपिड टेस्टमधील 269 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 304 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आले गाले अहवाल पुढीलप्रमाणे : दे. राजा: भगवान कॉलनी 62, 40, 13, 15 वर्षीय पुरूष, 11, 19 वर्षीय महिला, शनिवार पेठ 60, 36 वर्षीय महिला, असोला जहांगीर ता. दे. राजा : 23 वर्षीय दोन महिला, लोणार : 20, 23 वर्षीय पुरूष, 40, 39 वर्षीय महिला, सुलतानपूर ता. लोणार : 18 वर्षीय पुरूष, निंभोरा ता. जळगांव जामोद : 65, 23 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय महिला, खामगांव: 42, 70 व 40 वर्षीय पुरूष, सुटाळा 27, 14 वर्षीय महिला, 17, 45 वर्षीय पुरूष, वामन नगर 59 वर्षीय महिला, बालाजी नगर 54 वर्षीय पुरूष, शिवाजी वेस 4 वर्षीय मुलगी, 56, 25 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरूष, देशमुख प्लॉट 72 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 53 वर्षीय पुरूष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 33 रूग्ण आढळले आहे. तसेच आज उपचारादरम्यान हिवरा आश्रम, ता. मेहकर येथील 40 वर्षीय पुरूष रूग्णाचा बुलडाणा कोविड केअर सेंटर येथे मृत्यू झाला आहे. तसेच आज 9 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : शेगांव : दसरा नगर 10 वर्षीय मुलगा, चिखली : 40 वर्षीय दोन पुरूष, 4 वर्षीय मुलगा, 15, 32, 62, 24 वर्षीय महिला, डोणगांव ता. मेहकर : 22 वर्षीय पुरूष.
तसेच आजपर्यंत 8055 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 697 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 697 आहे. आज रोजी 407 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 8055 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1134 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 697 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 409 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 28 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

चुलत भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

nirbhid swarajya

श्री राम मंदीराचा पायाभरणी समारंभ दिवाळी सणाप्रमाणे साजरा करावा – आ.आकाश फुंडकर

nirbhid swarajya

चोरट्यांनी चोरलेल्या गाड्या सापडल्या विहिरीत…

nirbhid swarajya
error: Content is protected !!