बुलढाणा : शहरातील विदर्भ हाउसिंग सोसायटी येथे भावाने सख्या बहिणीचा खून केल्याची घटना समोर आली आहे.
विदर्भ हाउसिंग सोसायटी मधे राहणार सागर शर्मा याने त्याची सख्खी बहिन अंकिता शर्मा हिचा गळा आवळून व मारहाण करीत खून केल्याची घटना आज सकाळी घडली,शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ धाव घेऊन घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. खुनाचे नेमके कारण समजू शकले नसले तरी भावानेच बहिणीचा खून केल्याचे उघड झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खून का झाला याचा बुलढाणा शहर पोलीस तपास करीत आहे.आरोपी सागर शर्मा हा सराईत गुन्हेगार त्याने बुलढाणा पोलिसात स्वतः जावुन खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.आरोपी भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
previous post
next post