April 18, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बुलडाणा

ऑनलाइन उडविले खात्यातून 11 लाख…

पे-टीएम क्लोन तयार करुन केले 250 ट्रांजेक्शन

खामगाव : सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंत्याच्या बँक खात्यातून चक्क ११ लाख रूपये ऑनलाईन पध्दतीने लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव तथा जळगाव जामोद सार्वजनीक बांधकाम विभागात ज्युनिअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले राजेश विष्णु एकडे यांच्या खामगांव येथील स्टेट बँकेच्या खात्यातून अज्ञात इसमाने तब्बल १० लाख ६० हजार रूपये ऑनलाईन पध्दतीने उडविल्याचे घटना आज समोर आले.त्यांना गंडविणारा इसम हा आसाम येथील असल्याचे समजले.या इसमाने अभियंता एकडे यांच्या बँक खात्यातून मागील एक ते दोन महिन्यापासून सुमारे २५० वेळा पैसे ट्रांसफर केले मात्र बँके कडून कुठलेच मॅसेज व सूचना मिळाल्या नाही. २३ जुलै रोजी ते कामानिमित्त बँकेत गेले असता अकाऊंटमधून चक्क ११ लाख रूपये लंपास झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना धक्काच बसला.

याबाबत त्यांनी तातडीने बँकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांच्या अकाऊंटमधून आसाम राज्यातील एका इसमाने त्याच्या आयसीआयसीआय बँकेच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केल्याचे समजले असता अभियंता एकडे यांनी तात्काळ शहर गाठुन पोस्टेत तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीचे एकाउंट सीज केले असुन अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसांनी कलम 66 क माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपिचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती खामगांव शहर पोस्टे चे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी निर्भिड स्वराज्यशी बोलताना दिली आहे.

Related posts

टीव्ही जर्नालिस्ट संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

nirbhid swarajya

बुलडाणा नगर परिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

nirbhid swarajya

संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे ६ जून रोजी प्रस्थान

nirbhid swarajya
error: Content is protected !!