November 20, 2025
अकोला आरोग्य खामगाव जिल्हा नांदुरा बुलडाणा मलकापूर शेगांव

भुसावळ विभागात क्यूआर कोड द्वारे कॉन्टॅक्टलेस तिकिट तपासणी

खामगांव : प्रवासी आणि तिकिट पर्यवेक्षक (टीटीई) कोविड -१९ साथीच्या प्रसारापासून वाचविण्यासाठी आता भुसावळ विभागात नवीन पर्याय सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत आरक्षण खिडकीवर तिकिट बुकिंग करताना प्रवाशांना त्यांचा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. मोबाईल वर क्यूआर कोडसाठी यूआरएल लिंक देण्यात येईल. टीटीईच्या मागणीनुसार, जेव्हा प्रवासी या यूआरएलचा लिंक ला क्लिक केल्यानंतर  मोबाइल स्क्रीनवर क्यूआर कोड दिसून येईल. हा क्यूआर कोड टीटीई द्वारे त्याच्या मोबाइलवर तिकिट तपासणी साठी स्कॅन केला जाईल, जेणेकरुन टीटीईला मोबाइल वर आरक्षणाची संपूर्ण माहिती मिळेल. या सुविधेचा मुख्य उद्देश सामाजिक अंतर राखून तिकिटांची तपासणी करणे आहे. प्रवाश्याच्या तिकिटाला स्पर्श न करता टीटीई आरक्षण तिकिट तपासू शकेल.असे भुसावळ रेल्वे मंडळाकडून कळवण्यात आले आहे.

Related posts

आस्थापने उघडण्याचे परवानगीसाठी व्यापाऱ्यांचे निवेदन

nirbhid swarajya

आज प्राप्त ४८ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर दोन पॉझीटीव्ह

nirbhid swarajya

पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती भाजप कार्यालयात साजरी

nirbhid swarajya
error: Content is protected !!