April 19, 2025
आरोग्य खामगाव बुलडाणा

अर्धा पावसाळा गेला तरी फॉगिंग मशीन बंदच

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर धुळ फवारणी दुर्लक्षित

खामगांव : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक भागात निजंतुकिकरण करण्यात आले.पण हे कामही कंटेन्मेंट झोन पुरता राहिले. आता अर्धा पावसाळा गेला ती कीटकजन्य आजरापासून बचाव करण्यासाठी शहरात फॉगिंग सुरू करण्यात आले नाही. बंद यंत्र पुन्हा कधी सुरू होतील, याची प्रतीक्षा नागरीकांना आहे.
साधारण पावसाळा सुरु झाल्याच्या 10 दिवसांनंतर खामगांव ही फवारणी व्हायला हवी होती मात्र शहरातील आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्याना कोरोना काळातील आवश्यक फवारणीच्या कामाकरिता आदेशित करण्यात आले होते. सदर कामेसुध्दा अत्यंत आवश्यक आहे. मात्र अजुन, शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचू लागले आहे.पावसाळ्यात डासांपासून साथीचे आजारही होवू शकतात.म्हणुन आता पूर्वीच्या फॉगिंग मशिन प्रभागनिहाय सुरु करणे आवश्यक होते. जेणेकरून साथीच्या आजारापासून खामगांवकरांचे रक्षण योग्य प्रकारे करता आले असते.आरोग्य विभागास सुध्दा स्वच्छतेच्या तसेच सफाईच्या कामाचा जास्त लक्ष ठेवण्यासाठी सूचना अद्याप नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली नाही असे दिसून येत आहे. गल्लोंगल्ली रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे जमा होत असल्याने प्लास्टिक पन्नी,माती, व लोकांनी फेकलेला घाण कचरा रस्त्यावर येत आहे व त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होत आहे. नगरपालिकेमधील आरोग्य विभागाला या बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, लहान मशीन शहरातील 16 प्रभागात देण्यात आल्या आहे, तर मोठ्या मशीन द्वारे लवकरच फवारणी करण्यास सांगितले आहे. येत्या दोन- तीन दिवसात फॉगिंग मशीन द्वारे फवारणी शहरात सुरु होणार आहे.त्वरित साफसफाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.पावसाच्या पाण्यामुळे जमा होणारे पाण्याचे डबके तयार होणार नाहीत याकरिता आरोग्य विभागाने खबरदारी घेणे आवश्यक असताना नगरपालिका प्रशासनाचे या कामाकडे हलगर्जी पणा होताना दिसत आहे.

Related posts

डोंगराजवळ आढळले इसमाचे प्रेत; घातपाताचा संशय

nirbhid swarajya

विनापरवानगी ते वृक्ष कापणारा डिजिटल फलक व्यावसायिक

nirbhid swarajya

आयपीएल सट्टावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही

nirbhid swarajya
error: Content is protected !!