January 8, 2025
शिक्षण शेगांव

हलाखीच्या परिस्थितीतही कु. प्रिया राजवैद्य या मुलीने मिळवीले बारावीत 93.54 टक्के

शेगाव : शेगाव तालुक्यातील मनसगाव येथील कु.प्रिया संजय राजवैद्य हिला इयत्ता 12 वी विज्ञान शाखे मध्ये 93.54 % गुण मिळाले. प्रिया चे वडील पौराहित्य काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तसेच त्यांची परिस्थितीही खूप हलाकीची आहे, त्यांच्या कडे राहायला पक्के घर सुद्धा नाही, पण परिस्थितीवर मात करत प्रिया हिने घरामध्ये आईला कामात हातभार लावून चिकाटीने अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.

तिने यासर्व गोष्टीचे श्रेय आपले शिक्षक नंदलाल उन्हाळे सर यांना आणि आपल्या आई वडिलांना दिले आहे. तसेच प्रिया ला इयत्ता 10 वीत ही 98% मिळाले होते.हलाकीच्या परिस्थितीतून मात करत 12 वी मधे 93.54% मिळवणाऱ्या प्रिया राजवैद्य हिला निर्भिड स्वराज्य कडून सलाम…..!

Related posts

परिक्षा रद्द झाल्याने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची परिक्षा फी परत करा – शुभम ढवळे

nirbhid swarajya

कोरोना वर मात करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला रुग्णालयातून सुट्टी

nirbhid swarajya

कपाशी पीक जळाल्याने शंभर टक्के नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी…

nirbhid swarajya
error: Content is protected !!