January 6, 2025
महाराष्ट्र

राजगृहाबाहेर तोडफोड करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह येथे फुलझाडांच्या कुंड्या आणि खिडक्यांच्या काचांची तोडफोड करणारा अखेर १५ दिवसांनी माटुंगा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.विशाल अशोक मोरे ऊर्फ विठ्ठल काण्या (२०) असे त्याचे नाव असून कल्याण रेल्वेस्थानका बाहेरून त्याला अटक करण्यात आली आहे. भीमराव आंबेडकर यांच्या तक्रारीवरून माटुंगा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.७ जुलै रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, तोडफोड करणाऱ्या आरोपीसोबत असणाऱ्या उमेश जाधव (३५) याला पोलिसांनी अटक केली होती.त्याच्या चौकशीतून तोडफोड करणाऱ्याचे नाव कालिया असल्याचे समोर आले.लॉकडाऊन दरम्यान राजगृहाबाहेरील परिसरात मोफत जेवण वाटप होत असताना त्याची कालिया सोबत भेट झाली.
दोघेही पदपथावरच राहायचे. मात्र, त्याच्याबाबत जास्त माहिती नसल्याने अडचणी निर्माण झाल्या. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस कालियापर्यंत पोहोचले. पूर्व द्रुतगती मार्गाने त्याने चालतच दादर ते ठाणे प्रवास केला. मात्र, पुढे सीसीटीव्ही नसल्याने तो कुठे गेला? हे समजू शकत नव्हते. त्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी बक्षीसही जाहीर केले होते. मोरे हादेखील बिगारी काम करत असून, सध्या कल्याण रेल्वेस्थानकाबाहेरील पदपथावर राहायचा. राजगृहाबाहेरील जेवण मिळत असल्याने मोरे तेथीलच समोरच्या पदपथावर राहायचा. मात्र, घटनेच्या आदल्या दिवशी त्याला हटकल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून समोर येत आहे.

Related posts

माँ जिजाऊ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वाडी तर्फे शिक्षक दिनी वाडी परिसरातील सर्व शिक्षकांचा केला सन्मान …

nirbhid swarajya

भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मागणीचे निवेदन

nirbhid swarajya

रागाच्या भरात मनोरुग्न मुलाकडून वडिलांचा खून

nirbhid swarajya
error: Content is protected !!