January 7, 2025
खामगाव

भाजपचे स्विकृत नगरसेवक यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश; लॉकडाऊन मध्ये भाजपला धक्का

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे. प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यास लागले असता जिल्ह्यातील राजकीय नेते मात्र आपले वजन वाढविण्याकरिता लॉकडाऊन मध्ये अनेक डाव खेळताना दिसून येत आहेत. भाजपचे खामगाव नगर परिषद मध्ये भाजपची सत्ता असून भाजपाने अल्पमताने पडलेले किशोर भोसले यांना स्विकृत नगरसेवक पद दिले होते, मात्र पराभवानंतर त्यांच्या मनातील नाराजी काहीशी वाढतच गेली. भाजपच्या पक्षश्रेष्ठी वर नाराज असलेले किशोर भोसले यांनी रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या नावाप्रमाणे रात्री खेळ करून काँग्रेस चे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या सोबत मुंबई गाठत भारतीय कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबई येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार सानंदा यांच्यासह काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. किशोर भोसले हे खामगाव मध्ये पैलवान म्हणून प्रसिध्द आहेत, त्यांनी कुस्तीसह राजकारणातील अनेक डावपेच खेळलेले आहेत. शहरातील चांदमारी येथील जय भवानी सेवा ग्रुप आणि मराठा सेवा संघात सुध्दा ते सक्रिय असून ते पत्रकार देखील आहेत. भाजपातून त्यांचा जाण्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Related posts

मंदिरे उघडण्यास आघाडी सरकारने दिलेली परवानगी म्हणजे वारकरी व भक्तांच्या विजय-अशोक सोनोने

nirbhid swarajya

नकली नोटा घेऊन जाणारी टोळी अपर पोलीस अधिक्षक पथकाने पकडली

nirbhid swarajya

विहिरीत आढळला युवक- युवती चा मृतदेह!

nirbhid swarajya
error: Content is protected !!