November 20, 2025
शिक्षण

परिक्षा रद्द झाल्याने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची परिक्षा फी परत करा – शुभम ढवळे

बुलडाणा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महाविद्यालय अंतर्गत असलेल्या यावर्षीच्या परिक्षा रद्द केल्या आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी भरलेली परिक्षा फी परत द्यावी अशी मागणी शिवछावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शुभम ढवळे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचेकडे केली. राज्यातील एका शिवाजी विद्यापीठाच्या अतंर्गत 3 जिल्ह्यातील एकूण 279 महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयाकडून लॉकडाऊन पुर्वी अंतिम वर्षाच्या परिक्षेसाठी परिक्षा फी घेतलेली आहे. या सर्व महाविद्यालयात वेगवेगळ्या विभागातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 13.50 कोटी रूपये परिक्षा फी आपल्या विद्यापीठाकडे जमा झालेली आहे. राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये असे लाखो विद्यार्थी असून त्या विद्यार्थ्यांची फी माफ होणे गरजेचे आहे. सर्व विद्यार्थी शेतकरी, शेतमजूर, कामगार, तसेच गरीब सर्वसामान्य वर्गातील जनतेची मुले आहेत. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने सध्या सर्वत्र मंदीची लाट सुरू आहे. लाखो लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. कामगार वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतीमालाला भाव नाही. त्यातच राज्य सरकारकडून महाविद्यालयाच्या अंतिम परीक्षा रद्द केल्या आहेत. परिक्षाच रद्द झाल्याने राज्यातील सदर परिक्षेची जेणेकरून पालकांना व विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.

Related posts

गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत यांची मोताळा पंचायत समिती बदली…

nirbhid swarajya

अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला

nirbhid swarajya

महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणवर व्याख्यान;खामगाव तंत्रनिकेतनात आयोजन…

nirbhid swarajya
error: Content is protected !!