November 20, 2025
जिल्हा बातम्या शेगांव शेतकरी

बुलडाण्यात बैलाची दुधाने आंघोळ घालुन स्वाभिमानीचे आंदोलन.

शेगांव : सरकारने दुधाचा दर वाढवुन प्रति लिटर दुधाला १० रुपये अनुदान द्यावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर रस्त्यावर उतरली आहे. बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी चक्क बैलांना दुधाची आंघोळ घालुन आंदोलन केले आहे. सरकारने दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान द्यावे,दुध पावडरला प्रति किलोला ५० रुपये अनुदान द्यावे. व तुप, दुध पावडर, व बटर यावरील जी एस टी कमी करावा अशी मागणी या आंदोलनातुन करण्यात आली आहे. सरकारने राजु शेट्टी यांच्या दुध बंद आंदोलनाची दखल न घेतल्यास देशाला लागणारे अन्न धान्य बंद करावे लागेल असा ईशारा या आंदोलनातुन सरकारला देण्यात आला आहे.

Related posts

पवित्र रमजान महिन्यातही एकत्र येवून नमाज अदा करू नये – जिल्हाधिकारी

nirbhid swarajya

सरपंच उन्हाळे यांच्या वाढदिवसानिमीत्त भव्य आरोग्य व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

nirbhid swarajya

४० वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

nirbhid swarajya
error: Content is protected !!