November 20, 2025
बातम्या

मनसगाव सेंट्रल बँकेचा गलथान कारभार; पिककर्ज न मिळाल्यास शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

शेगाव : शेगाव तालुक्यातील मनसगाव या गावातील सेंट्रल बँकेच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी हैराण व त्रस्त झाले आहेत. या सेंट्रल बँकेविषयी अनेक वेळा तक्रारी करूनही या बाबीकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक व शेतकरी वर्ग करत आहेत.
मनसगाव येथे सेंट्रल बँकेत कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सहा महिन्यापासून पासबुक मध्ये याची एन्ट्री बंद आहे तर शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या फाईली तशाच पडून आहेत. दिवसाला जास्तीत जास्त फाईल काढण्याची गरज असताना सध्याच्या कोरोना परिस्थितीत काम करत असलेल्या कर्मचार्‍यांचा अभाव असल्यामुळे पीक कर्ज शेतकर्‍यांना देण्यात उशीर होत आहे असे कारण सांगत आहेत. तसेच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन नसून येथील एटीएम सेवा सुद्धा नेहमी विस्कळीत असते, विद्युत पुरवठा नसतांना पर्यायी व्यवस्था याठिकाणी नसते. पेरणी होऊन एक महिना उलटल्यानंतरही जर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसेल तर मनसगाव येथील शेतकरी भारत भाऊ कंकाळ यांनी बँकेसमोर सर्व शेतक-यांसह आत्मदहनाचा इशारा दिला आहे आणि तसे पत्र मनसगाव सेंट्रल बँकेकडे दिले आहे.

Related posts

भारतीय रेल्वेची खासगीकरणाकडे वाटचाल, 109 मार्गांवर 151 खाजगी रेल्वे धावणार

nirbhid swarajya

काँग्रेसचे जेष्ठ नेते रामकृष्ण पाटील यांचे निधन

nirbhid swarajya

बंदुकीच्या धाकावर व्यापाऱ्यांस लुटण्याचा प्रयत्न…

nirbhid swarajya
error: Content is protected !!