January 7, 2025
खामगाव शिक्षण

दहावी व बारावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थी विद्यार्थीनींचे हार्दिक अभिनंदन- आ.ॲड. आकाश फुंडकर

खामगांव : सध्या संपूर्ण जगात कोरणा-या विषाणूच्या महामारीमुळे जग त्रस्त आहे अशा परिस्थितीत सगळ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षांचा निकालाची प्रतीक्षा होती या तणावाच्या वातावरणात देखील आपण चांगले यश संपादन केले त्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन. दहावी व बारावी हे जीवनातले महत्त्वाचे टप्पे आहेत यातून विद्यार्थी आपल्या जीवनाची दिशा ठरवत असतात. विद्यार्थ्यांच्या दहावी व बारावीच्या निकालाची प्रत्येक पालकाला निकालाची प्रतिक्षा असते आणि त्यातच आपल्या मुलाने मिळवलेले यश ही त्यांच्यासाठी आंनद गगनात मावेनासा करणारे ठरते. मुलाने मिळवलेले चांगले गुण हे त्यांच्या आयुष्यातले एक स्वप्न असते आणि आई-वडिलांच्या या स्वप्नांची पूर्ती विद्यार्थी करत असतात. यश-अपयश हे प्रत्येकाच्या जीवनात प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात. दहावी बारावी ही जीवनातली पहिली पायरी असून याठिकाणी अपयश मिळाल्यास कोणीही खचून जाऊ नये. जीवनात यापुढे असे असंख्य टप्पे येत असतात त्यात अपयश आपल्या पदरी पडते. परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात. या वेळी ज्यांना अपयशाचा कटू अनुभव आला तर तो पुढील भविष्याची शिदोरी समजून पुढे मार्गक्रमण करत रहावे कारण या अपयशातून यश कसे प्राप्त करावे याचा मार्ग दाखवणारे हे अपयशी ठरू शकते. त्यामुळे कोणीही खचून न जाता जीवन हे संघर्षमय असते हे लक्षात ठेवून यशापयशाचा विचार न करता सतत मार्गक्रमण करत राहावे असे आमदार आकाश फुंडकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना म्हटले.

Related posts

गुंजकर ज्यु अँड सीनिअर कॉलेज मध्ये गणपती विसर्जन सोहळा संपन्न..

nirbhid swarajya

फीजिकल डीस्टंसिंग पाळत पार पडला आदर्श विवाह सोहळा

nirbhid swarajya

१०वी, १२वी परीक्षांच्या तारखा बदलल्या…

nirbhid swarajya
error: Content is protected !!