November 20, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 269 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 27 पॉझिटिव्ह

13 रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 296 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 269 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 27 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 4 व रॅपिड टेस्टमधील 23 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 23 तर रॅपिड टेस्टमधील 246 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 269 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव : बाळापूर फैल – 53 वर्षीय पुरूष, 28, 17,40 वर्षीय महिला, शिवाजी नगर : 45 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरूष. देशमुख प्लॉट 27 वर्षीय पुरूष. दे. राजा : 38 व 40 वर्षीय पुरूष, जुना नगर परिषद जवळ 24,59 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला, अहिंसा मार्ग 67 व 52 वर्षीय महिला. शेगांव : देशमुखपुरा 58 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरूष, टिचर कॉलनी 30 वर्षीय महिला, धनगर फैल 75 वर्षीय महिला, चिखली : डी.पी रोड 69 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला, जानेफळ ता. मेहकर : 42 वर्षीय महिला, जळगांव जामोद : 25 व 59 वर्षीय पुरूष, सुलतानपूर ता. लोणार येथील 50 वर्षीय महलिा, कुंबेफळ ता. सिं. राजा 56 वर्षीय महिला, मलकापूर : 45 वर्षीय पुरूष आणि कोथळी ता. मोताळा येथील 47 वर्षीय पुरूष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 27 रूग्ण आढळले आहे.तसेच आज 13 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये नांदुरा येथील 55 वर्षीय पुरूष, 18, 45, 20, 26, 9 वर्षीय महिला,इकबाल चौक बुलडाणा येथील 43 वर्षीय पुरूष, नॅशनल स्कूलजवळ खामगांव येथील 40 वर्षीय पुरूष, खामगांव येथील 60 वर्षीय पुरूष, वाडी खामगांव येथील 35 वर्षीय पुरूष, आरोग्य कॉलनी शेगांव येथील 69 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय पुरूष व सुलतानपूर ता. लोणार येथील 50 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 5844 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 310 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 310 आहे. आज रोजी 94 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 5844 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 696 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 310 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 366 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 20 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

  

Related posts

अण्णा भाऊ साठे नगर म्हाडा कॉलनीत घाणीचे साम्राज्य

nirbhid swarajya

नांदुरा जळगाव जामोद महामार्गावर भीषण अपघात…

nirbhid swarajya

शेत नुकसानीचे पंचनामे करुन त्‍वरीत आर्थिक मदत द्यावी- धनंजय देशमुख

nirbhid swarajya
error: Content is protected !!