January 6, 2025
चिखली जिल्हा बुलडाणा शिक्षण

बारावीत ७९% टक्के मिळवूनही विद्यार्थ्याची आत्महत्या

इंग्रजीत कमी मार्क मिळाल्याने मानसिक तणावातून केली आत्महत्या..

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कव्हळा येथे इयत्ता बारावीच्या युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटे ५ वाजता च्या सुमारास उघडकीस आली आहे. सदर युवकाचे नाव विनायक संतोष लांडे वय १८ वर्षे असून तो इयत्ता बारावी ला होता मात्र काल बारावीचा निकाल लागला असून विनायक ला ७९% एवढे गुण मिळाले होते परंतु विनायक हा इंग्रजी विषयात नेहमी अव्वल असायचा पण दिनांक 16 जुलै 2020 त्याला इंग्रजी विषयात केवळ ५६ टक्के मिळाले असल्याने आज विनायक पहाटे ५ वाजता घरातून कोणालाही न सांगता आपल्या शेतात निघून गेला व शेतातील आंब्या च्या झाडाला नायलॉन च्या दोरीने साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली व आत्महत्या करणाऱ्या युवकाच्या बहिणीचा देखील पॉलिटेक्निक चा काही दिवसा आधी निकाल लागला असून तिला ८४% मिळाले आहेत अशी माहिती गावकऱ्यांनी व कुटुंबियांनी दिली आहे. पण विनायकला अपेक्षेप्रमाणे कुठल्याच विषयात मार्क्स मिळाले नसल्याचे त्याने आत्महत्या केली असेल अशी शंका त्याच्या शिक्षकाने व्यक्त केली आहे.

Related posts

शेतकरी कुटुंबातील कु.प्रिया गोळे जेईई अँडव्हान्स परीक्षेत अकोल्यातून अव्वल

nirbhid swarajya

शेगाव ते चिंचखेड विशेष बसफेरी शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू

nirbhid swarajya

मराठा सेवा मंडळ जिल्हाध्यक्ष पदी प्रभाकर लांजुडकर यांची निवड…

nirbhid swarajya
error: Content is protected !!