January 7, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात प्राप्त 311 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 69 पॉझिटिव्ह

13 रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 380 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 311 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 69 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपिड टेस्टमधील 68 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 14 तर रॅपिड टेस्टमधील 297 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 311 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव : भुसारी गल्ली – 73, 32, 35, 44, 6 व 36 वर्षीय पुरूष, 28, 33, 45, 22, 65 वर्षीय महिला, 6 महिन्याची मुलगी. बाळापूर फैल : 15, 21, 65, 85, 38, 22, 28 वर्षीय महिला, 11, 35, 10, 15 व 5 वर्षीय पुरूष. जलंब नाका : 20 वर्षीय पुरूष, 21, 42 वर्षीय महिला. बोदडे कॉलनी : 29 व 35 वर्षीय महिला. दे. राजा : वाल्मिक नगर- 65, 31, 36, 37, 30, 11 व 9 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय महिला, आंबेडकर नगर : 59 वर्षीय पुरूष, सिव्हील कॉलनी : 51 व 19 वर्षीय पुरूष,43 वर्षीय महिला, अग्रसेन चौक : 29 व 2 वर्षीय पुरूष, जुना जालना रोड : 57 वर्षीय पुरूष व 45 वर्षीय महिला, बालाजी नगर : 34 वर्षीय पुरूष, जळगांव जामोद : 22 वर्षीय पुरूष, रामनगर – 60 वर्षीय पुरूष, शेगांव : 60 व 59 वर्षीय महिला, चारमोरी : 60 वर्षीय महिला, खिरानी मळा 19 वर्षीय महिला, उमेश नगर 46 वर्षीय महिला, दसरा नगर 30 वर्षीय पुरूष, नांदुरा : विदर्भ चौक 60 वर्षीय पुरूष, माळीपुरा 51 वर्षीय पुरूष, ओमनगर 32 व 40 वर्षीय पुरूष, नांदुरा खुर्द 70 वर्षीय पुरूष, बुलडाणा : मुठ्ठे ले आऊट 58 वर्षीय पुरूष, नागापूर ता. मेहकर : 50 वर्षीय पुरूष, चिखली : शिक्षक कॉलनी 70 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरूष, बगीचाजवळ 26 वर्षीय पुरूष, दुध डेअरीजवळ 10 वर्षीय मुलगी, आनंद नगर 29 वर्षीय पुरूष, करवंड ता. चिखली : 60 वर्षीय महिला आणि मलकापूर : 47 वर्षीय पुरूष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 69 रूग्ण आढळले आहे.
यामध्ये आज उपचारादरम्यान करवंड ता. चिखली येथील 40 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 13 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये मंगल गेट मलकापूर येथील 17, 48 व 27 वर्षीय पुरूष, 45 व 31 वर्षीय महिला, आळंद ता. मलकापूर येथील 19 वर्षीय महिला, बस स्थानकाजवळ खामगांव येथील 34 वर्षीय महिला, मखानीया मैदान खामगांव येथील 35 व 32 वर्षीय महिला, शेगांव रोड खामगांव येथील 18 वर्षीय महिला, आळसणा ता. शेगांव येथील 40 व 56 वर्षीय पुरूष आणि मलकापूर येथील 24 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 5339 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 285 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 285 आहे.
आज रोजी 35 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 5339 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 625 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 285 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 319 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 18 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 402कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 70 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

ठाकरे – पवारांना राज्यातून संसपेंड करणार आहे – किरीट सोमय्या

nirbhid swarajya

सुटाळा खु.ग्रामपंचायत सदस्या सौ.शितल ठाकरे यांच्या पुढाकारातून आरोग्य तपासणी

nirbhid swarajya
error: Content is protected !!