January 6, 2025
आरोग्य जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात आज प्राप्त 197 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 37 पॉझिटिव्ह

17 रूग्णांची कोरोनावर मात


बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 234 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 197 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 37 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 12 व रॅपिड टेस्टमधील 25 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 10 तर रॅपिड टेस्टमधील 187 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 197 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह अहवालामध्ये खामगांव शहरातील 56 व 60 वर्षीय महिला तसेच शहरातीलच रेखा प्लॉटमधील 40 वर्षीय पुरूष, सुटाळा 20 वर्षीय महिला, शिवाजीनगर 38 वर्षीय महिला, वाडी भागातील 26, 47 व 70 वर्षीय महिला, शंकर नगरमधील 32 वर्षीय पुरूष, 60 व 54 वर्षीय महिला, पुरूष, 28 व 52 वर्षीय पुरूष, 19, 20, 46 व 60 वर्षीय महिला, दाल फैल भागातील 40 वर्षीय महिला, केला नगर मधील 31 वर्षीय महिला व 6 महिन्याचा मुलगा, मलकापूर शहरातील शिवाजी नगरमधील 28 व 45 वर्षीय पुरूष, मंगल गेट 66 वर्षीय पुरूष व 62 वर्षीय महिला रूग्णाच्या अहवालांचा समावेश आहे. तसेच चिखली शहरातील 39 व 21 वर्षीय पुरूष, 49 वर्षीय महिला, महिला, 45 वर्षीय पुरूष व 49 वर्षीय महिला, एसबीआय कॉलनी शेगांव येथील 31 वर्षीय पुरूष, दुर्गापुरा दे. राजा येथील 64 वर्षीय महिला, सावजी गल्ली मेहकर येथील 24 वर्षीय पुरूष, करवंड ता. चिखली येथील 40 वर्षीय पुरूष, मूळ पत्ता उल्हास नगर मुंबई येथील असलेले 45 वर्षीय पुरूष, गुळभेली ता. मोताळा येथील 47 वर्षीय पुरूष संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 37 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 17 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये जळगांव जामोद येथील 50 वर्षीय महिला, जोगडी फैल शेगांव येथील 4 वर्षीय मुलगा व 30 वर्षीय महिला, नांदुरा येथील 37 वर्षीय महिला, समर्थ नगर खामगांव येथील 53 वर्षीय महिला, घासलेटपुरा नांदुरा येथील 10,12 व 13 वर्षीय मुलगी, 45 व 24 वर्षीय पुरूष, 6 वर्षीय मुलगा, दाल फैल खामगांव येथील 75 वर्षीय महिला, टेंभुर्णा ता. खामगांव येथील 20 वर्षीय पुरूष, फाटकपुरा खामगांव येथील 54 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगी, 42 वर्षीय महिला आणि मूळ पत्ता बोदवड जि. जळगांव असलेल्या 24 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 4578 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 252 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 252 आहे.
आज रोजी 128 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 4578 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 482 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 252 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 213 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 17 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

किमान आधारभुत किंमत खरेदी योजनंतर्गत मका/ज्वारी शासकीय खरेदीचा शुभारंभ

nirbhid swarajya

सर्जा-राजाचा सण ‘बैलपोळा’…लासुरा बु येथील जवंजाळ परीवाराचा पोळा ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात

nirbhid swarajya

लाखनवाडा येथे गणेश उत्सव निमित्त शांतात समितीची बैठक पार:-

nirbhid swarajya
error: Content is protected !!