November 20, 2025
बातम्या

४ पानटपरी धारकांविरुद्ध पोलिसांची करवाई

खामगांव : कोरोनाचा विषाणुचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पानटपऱ्या बंद करण्यात आल्या आहे.जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी एका आदेशान्वये पानटपरी उघडण्यास मनाई केली आहे.त्यामुळे शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या हद्दित येणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी पानटपऱ्या उघडल्यामुळे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी 23 मार्च रोजी दिलेल्या एका आदेशान्वये पानटपरी उघडन्याचे आदेश नसताना येथील घाटपुरी येथील अमोल रमेश कापडे,सजनपुरी भागात सचिन किसन बेनीवाल,जुगनु ढाब्याजवळील रमेश मनोहर इटनारे व एमआयडीसी भागात मनोज मोहन लांडगे यांनी काल ४ जुलै रोजी पानटपरी उघडून गर्दी जमा केली व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी शिवाजी नगर पोस्टेचे पीएसआय मनोज सुरवाडे व पीएसआय बारिंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त चौघांविरूध्द भादंवि कलम २६९,२७० सहकलम साथीचे रोग अधिनियम २, ३ आपत्ती व्यवस्थापन ५१ ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

सामूहिक विवाह सोहळ्यात माझ्या असंख्य मुलींना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे – अशोकभाऊ सोनोने

nirbhid swarajya

विम्यापासून व कर्जमाफी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनसाठी लढा उभारणाऱ्याची गरज- प्रशांत डिक्कर

nirbhid swarajya

अतिवृष्टीमुळे जळगाव जामोद तालुक्यातील पीक नुकसानीचे हेक्टरी ५००००/-रु मदत जाहीर करा- रा.काँ.प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील यांची मागणी

nirbhid swarajya
error: Content is protected !!