November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले 22 कोरोना पॉझिटिव्ह

बुलडाणा : आज जिल्ह्यात एकाच दिवशी 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा आता 300 वर पोहोचला आहे. यामध्ये शेगावमधील अळसना या एका गावातच 12 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आज प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये जामठी धाड येथिल 2 रुग्ण, चिखली येथे 1, आळसना 12, नांदुरा 2, जळगाव जामोद 1, टेंभुर्णा (खामगाव) 1, सुलतानपुर 2 आणि मलकापूर येथे 24 वर्षीय तरुणी असे एकूण 22 रुग्ण सापडले आहेत. अकोला प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालातून आज 22 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव दिवसेंदिवस वाढताना दिसुन येत आहे. प्रशासनातर्फे वारंवार सुचना देऊनही लोक याला दुर्लक्षित करतांना दिसत आहेत. वेळीच जर सतर्कता बाळगली नाही तर आणखी कोरोनाचा आकडा वाढायला वेळ लागणार नाही.

Related posts

शिवाजी नगर पोलिसांनी दारूची अवैध वाहतूक करणारी कार पडकली…

nirbhid swarajya

प्रसाद डांगे ची वैद्यकीय शिक्षणाकरीता निवड….

nirbhid swarajya

समृद्धी महामार्गाच्या टिप्पर ला भीषण अपघात

nirbhid swarajya
error: Content is protected !!