December 14, 2025
नांदुरा

कत्तली साठी 27 गाई घेऊन जाणारा ट्रक पकडला

नांदुरा : कत्तली साठी घेऊन जाणाऱ्या 27 गाईंना पाठलाग करुन पकडल्याची घटना आज संध्याकाळी 9:30 च्या सुमारास नांदुरा येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार मलकापुर कडून नांदुरा कडे एक ट्रक dcm क्र. GJ-13-AW-3376 भरगाव वेगाने जाताना शुभम पाटील व गणेश पाटील यांना दिसले. त्यांना त्या गाडीबद्दल संशय आल्याने त्यांनी वडनेर भोलजी जवळ गाडीस अडवण्याचा प्रयत्न केला पण चालकाने गाडी भरधाव पुढे नेली असता त्यांनी लगेचच ही बातमी निर्भिड स्वराज्यच्या टीम ला फ़ोन करुन यांची माहिती दिली व निर्भिड स्वराज्यच्या टीम ने मलकापुर येथील SDPO प्रिया ढाकने यांच्या सोबत संपर्क केला असता मॅडम ने सांगितले की त्या सुट्टी वर आहे व चार्ज हा खामगांव येथील SDPO प्रदीप पाटील यांच्या कडे आहे. तेव्हा लगेचच निर्भिड स्वराज्य टीम ने प्रदीप पाटील यांच्या सोबत संपर्क साधला व त्यांनी लगेचच पथक पाठवले.पोलिस पथकाने लगेचच नांदुरा शहराच्या नाका बंद वर सदर वाहन पकडले असता त्यांना त्या ट्रक मधे 27 गाई आढळून आल्या. पोलिसांनी ही गाडी आणि त्यातील 27 गाई जप्त केल्या असून पुढील कारवाई सुरु आहे.

Related posts

देशमुख परिवारात आगळीवेगळी आदर्श शिवजयंती साजरी

nirbhid swarajya

पत्रकार संजय वर्मा यांच्यावरील खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा खामगाव शहरातील पत्रकार बांधवांची मागणी राज्‍यपाल, निवडणूक आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन

nirbhid swarajya

संभाजी ब्रिगेड नांदुरा तर्फे रक्तदान शिबिर

nirbhid swarajya
error: Content is protected !!