खामगांव : कोरोना विषाणूमुळे अख्या जगावर मोठे संकट ओढवले आहे. या विषाणूने अनेकांच्या हातचा घास हिरावला तर अनेक हातांना बेरोजगारही केले तसेच अनेकांच्या मुहूर्तावर पाणीही फिरवलं मात्र या अशा परिस्थितीतही काही विवाह होत आहेत व यातीलच काही विवाह समाजासमोर आदर्शही ठेऊन जात आहेत.
कोरोनाच्या काळात वॉरियर्स ची भूमिका निभावणारे खामगाव येथील पत्रकार महेंद्र गजानन बनसोड व सुमित रवींद्र पवार यांनी फिजीकल डीस्टंनसिंग पाळत आदर्श विवाह केलेला आहे.
काल दिनांक २९ जून रोजी महेंद्र बनसोड राहणार लक्कडगंज खामगाव यांचा विवाह शिवानी विजय घोडके (पुणे) यांच्याशी झाला व आज दिनांक ३० जून रोजी सुमित रवींद्र पवार (राहणार रेखा प्लॉट खामगाव) यांचा विवाह स्वाती मुरलीधर चौधरी (राहणार वाडी खामगाव) यांच्याशी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत, फीजिकल डीस्टंसिंग पाळत तसेच सेनीटायझर चा वापर करून पार पडला. कोरोना विषाणूमुळे सर्वत्र संकट ओढवले असल्याने अशा प्रसंगी विवाहावर खर्च करणे योग्य नाही. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय या दोघांनीही घेतला होता तसेच घरातील सर्वांनी दुजोरा दिल्याने दोन्ही पत्रकारांचा विवाह पार पडला असून या आदर्श विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
