खामगाव: कोरोनाच्या महामारी च्या संकटात लोकांना खायला अन्न मिळत नाही आहे.अशातच गरीबांच्या तोंडाचा घास पळवण्याच्या तयारित असलेला राशनचा तांदूळ गोंधनापुर येथे पकडला आहे. २८ जून रोजी दुपारच्या सुमारास वाहन क्र.MH-28-AV-1657 या छोटा हत्ती मधून रेशनचा तांदुळ काळ्या बाजारात जात असल्याची
तहसीलदार डॉ. शितल रसाळ यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशाने पुरवठा निरीक्षण अधिकारी भगत व कर्मचाऱ्यांनी गोंधनापूर येथे जावुन सदर वाहन ताब्यात घेतले. यामध्ये निरीक्षण अधिकारी भगत यांनी सदर वाहन साडेबारा क्विंटल रेशनचा तांदुळ ताब्यात घेवून ग्रामीण पोलिस स्टेशन येथे वाहन जमा केले आहे. याबाबत पुरवठा निरीक्षण अधिकारी भगत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सदर तांदूळ उपाध्ये नामक व्यक्ति गावातील राशन कार्ड धारक 5 ते 6 लोकांकड़ूंन जमा करुन खामगावमधे काळ्या बाजारात विक्री करायला घेऊन जात होता असे त्यांनी सांगितले.याबाबतचा अहवाल तहसीलदार शितल रसाळ यांच्याकडे देण्यात आला असून त्यांच्या आदेशान्वये पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे भगत यांनी सांगितले.
next post
