November 20, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा

जिल्ह्यात प्राप्त 16 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 15 पॉझिटिव्ह

पाच रुग्णांची  कोरोनावर मात

बुलडाणा :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 31 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 16 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये शक्तीपुरा मलकापूर येथील 40 वर्षीय महिला, जोगडी फैल येथील 30 वर्षीय महिला, वरवट बकाल ता. संग्रामपूर येथील 51 वर्षीय पुरुष, अळसणा ता. शेगाव येथील 45 वर्षीय महिला, 72 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, 18 वर्षीय तरुण, 33 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय पुरुष रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे अळसणा ता. शेगाव येथे 6 रूग्ण आढळले आहे.     तसेच जळगाव जामोद येथील 53 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष व 67 वर्षीय पुरूष संशयीत रूग्ण पॉझीटीव्ह आले आहे. तसेच काँग्रेस नगर शेगाव येथील 19 वर्षीय तरुणी, निवाना ता. संग्रामपुर येथील 34 व 36 वर्षीय पुरूष रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशाप्रकारे 15 अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे.
तसेच आज 5 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून देण्यात आली आहे. त्यामध्ये जोगडी फैल शेगाव येथील 58 वर्षीय महिला, नांदुरा येथील 45 वर्षीय पुरुष, पारपेट मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, पातुर्डा ता. संग्रामपुर येथील 66 वर्षीय पुरुष व 37 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.  तसेच आजपर्यंत 2434 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 144 कोरोना बाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 144 आहे.  तसेच आज 28 जुन रोजी 31 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 15 पॉझीटीव्ह, तर 16 निगेटीव्ह आहेत. आज रोजी 126 तपासणी नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2434 आहेत.      जिल्ह्यात आजअखेर एकूण 213 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 144 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 58 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 11 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

जनुना तलावात युवकाची आत्महत्या,आत्महत्येचे गुढ कायम..?

nirbhid swarajya

मलकापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड हरीश रावळ यांच्या विरोधात कारवाई करणार – जिल्हाधिकारी

nirbhid swarajya

लॉकडाऊन मध्ये अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

nirbhid swarajya
error: Content is protected !!