चिखली : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे रहिवासी असलेले ग्रामविकास अधिकारी साहेबराव मोरे , वय ४७ वर्ष यांनी २५ जून रोजी खिश्यात संशयास्पद चिठ्ठी ठेवून राहत्या घरामध्ये पंख्याला नॉयलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलिसांनी तपासणीनंतर वडीलांच्या तक्रारीवरून मृतकाच्या पत्नी सह सासरच्या ४ जणांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ग्रामविकास अधिकारी मृतक साहेबराव मोरे हे चिखली येथील लुम्बिनी नगर मध्ये पत्नी आणि मुलाबाळासह राहत होते परंतु मृतक साहेबराव मोरे आणि पत्नी प्रज्ञा मोरे यांच्या मध्ये नेहमी वाद होत होता, त्यांच्यातील वाद हा घरच्या मंडळींनी आपसात केला होता, तरीही आरोपी पत्नी प्रज्ञा मोरे हिने पती साहेबराव मोरे विरुद्ध चिखली पोलीस स्टेशनला तक्रार करून गुन्हा केला होता आणि याला मदत तिचे आई वडील आणि भाऊ म्हणजेच सासू – सासरे आणि मेहुणा करीत होते. त्यामुळे पत्नी सासू – सासरे आणि साला यांनी त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केले अशी संशयास्पद चिठ्ठी खिश्यात ठेवून साहेबराव मोरे याने २५ जूनला आत्महत्या केली. मृतकाचे वडील पांडुरंग मोरे यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी तपासणीअंतर आरोपी पत्नीऊ प्रज्ञा मोरे , मेहुणा – मिलिंद गवई , सासरा – संतोष गवई, सासू – लता गवई यांच्या विरुद्ध कलम ३०६ ,३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.