January 7, 2025
खामगाव शेतकरी

तक्रारी केलेल्या शेतकऱ्यांना महाबीज देणार बियाणे

खामगाव : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणे उगवले
नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामध्ये जळगाव जामोद, संग्रामपूर,
खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान या शेतकऱ्यांना
तक्रार निवारण समितीच्या अहवालाची वाट न पाहत बियाणे देण्यात येणार आहेत. महाबीजचे बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांना तातडीने बियाणे देण्याचा आदेश राज्याच्या कृषी विभागाने राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना २३ जून रोजी दिला आहे.खरिप पेरणीचा हंगाम सुरू झाला. सुरुवातीला चांगला पाऊस आल्याने जळगाव जामोद, खामगाव, शेगाव, संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. दरम्यान, या तीनही
तालुक्यांमध्ये सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी मोठ्या
प्रमाणात झाल्या आहेत. त्याचे पंचनामेही तालुका कृषी अधिकारी,पंचायत समितीच्या कृषी विभागाने केले. तसेच काही ठिकाणी समितीने बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे अहवालही दिले. त्यातच शेतकऱ्यांनी कर्ज काढून प्रसंगी उधारीत बियाणे घेत पेरणी केली. मात्र, ते न उगवल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला.त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी पुढे आली. तसेच बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांवरही
कारवाईची मागणी झाली.

Related posts

खामगावात जनता कर्फ्यू १०० % यशस्वी.. आ.आकाश फुंडकर यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद

nirbhid swarajya

तिबार पेरणी च्या संकटाने शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

nirbhid swarajya

बुलढाणा जिल्हयात मध्यम पावसाची शक्यता

nirbhid swarajya
error: Content is protected !!