November 20, 2025
आरोग्य जिल्हा

जिल्ह्यात आज प्राप्त 83 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 08 पॉझिटिव्ह

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 91 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 83 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 08 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे धामणगांव बढे ता. मोताळा येथील 22 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 5 वर्षाची मुलगी व 65 वर्षीय पुरूष रूग्णाचे आहेत. तसेच मलकापूर येथील 52 वर्षीय पुरूष, 70 वर्षीय वृद्ध महिला, नांदुरा येथील 37 वर्षीय महिला व समर्थ नगर खामगांव येथील 53 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तसेच मलकापूर येथील 19 जुन 2020 रोजी दाखल 55 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला होता. सदर मयत रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आहे. त्यामुळे जिल्ह्याची मृत्यूसंख्या 8 झाली आहे.
जिल्ह्यामध्ये मलकापूर व संग्रामपूर तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. तसेच लोणार, सिंदखेड राजा, दे.राजा, चिखली व बुलडाणा तालुक्यात सध्या एकही क्रीयाशील कोरोना रूग्ण नसल्यामुळे हे तालुके कोरोनामुक्त आहे. मलकापूर येथे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसांची संचारबंदी पाळण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे आज 08 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार त्यांना आज सुट्टी देण्यात आली. शेगांव कोविड रूग्णालयातून पातुर्डा ता. संग्रामपूर येथील 22 वर्षीय पुरूष, 33 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय महिला यांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच खामगांव कोविड रूग्णालयातून चिखली, ता. खामगांव येथील 25 वर्षीय पुरूष रूग्णाला डिस्जार्ज देण्यात आला. तर बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून भीमनगर, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरूष, 20 वर्षीय तरूण, 60 वर्षीय पुरूष आणि 9 वर्षीय मुलाला सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे आठ रूग्णांनी आज कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
तसेच आतापर्यंत 2254 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 165 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी आठ मृत आहे. आतापर्यंत 122 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 122 आहे. सध्या रूग्णालयात 35 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
तसेच आज 22 जुन रोजी 91 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 08 पॉझीटीव्ह, तर 83 निगेटीव्ह आहेत. आज रोजी 12 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2254 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related posts

किरीट सोमय्यांच्या फोटोला जोडे ! प्रतिमा पायदळी तुडविली;ठाकरे गट आक्रमक

nirbhid swarajya

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वीज वितरण कंपनी ग्रामिण आर-१ सेंटरच्या कार्यालयात “ठीय्या आंदोलन”

nirbhid swarajya

उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्विकारणार

nirbhid swarajya
error: Content is protected !!