November 20, 2025
नांदुरा

शौचालयाच्या खडयात उतरलेल्या बापलेकाचा मृत्यू

नांदुरा : बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे शौचालयाच्या खडयात उतरलेल्या वडिलाचा व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत असे की निमगाव येथील रहिवासी  मधुकर नारायण टवलारकर (55) व त्यांचा मुलगा अनिकेत मधुकर टवलारकर (25) हे आज सकाळी ११ च्या सुमारास शौचालयाच्या खड्यात पडलेला मोबाईल काढण्यासाठी उतरले असताना मधुकर टवलारकर यांचा शौचालयाच्या खड्यातील गॅसमुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला तर अनिकेत टवलारकर याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ रुग्णवाहिकेने नांदुरा येथील रुग्णालयात हलविण्यात असता त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार,पोलीस कर्मचारी,आरोग्य पथक घटनास्थळावर दाखल झाले असून या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Related posts

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात साजरी

nirbhid swarajya

शेगाव तहसीलची अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर धडक कारवाई

nirbhid swarajya

राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार, शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार सहा हजार

nirbhid swarajya
error: Content is protected !!