January 1, 2025
आरोग्य जिल्हा

जिल्ह्यात आज प्राप्त 53 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 06 पॉझिटिव्ह

05 रुग्णांची कोरोना वर मात

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 61 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 53 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 06 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे लक्ष्मी नगर, मलकापूर येथील 55 वर्षीय पुरुष, पातुर्डा ता. संग्रामपुर येथील 37 वर्षीय महिला, संग्रामपूर येथील 33 वर्षीय पुरुष,  2 वर्षाची मुलगी, 38 वर्षीय महिला व जोगडी फैल, शेगाव येथील 4 महिन्याचे बाळाचे आहेत.  तसेच लक्ष्मी नगर मलकापूर येथील पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त  असलेले  55 वर्षीय पुरुष रुग्णाचा 16 जुन रोजी मृत्यू झाला आहे. सदर रुग्णाचा तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.   त्याचप्रमाणे आज 05 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार त्यांना आज सुट्टी देण्यात आली. यामध्ये हेडगेवार नगर मलकापूर  येथील 36 वर्षीय पुरुष, शास्त्री नगर मलकापूर येथील 27 वर्षीय महिला व 8 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. तसेच धोंगर्डी ता. मलकापुर येथील 70 वर्षीय वृद्ध महिला व 65 वर्षीय पुरुष रूग्ण आहेत. त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 2171 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 157 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी सात मृत आहे. आतापर्यंत 114 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 114 आहे.  सध्या रूग्णालयात 36 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.    तसेच आज 21 जुन रोजी 61 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 06 पॉझीटीव्ह, तर 53 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 62 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2171 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.


Related posts

पेपरला गेला अन मोबाईल गेला चोरीला, अन विद्यार्थीचं निघाला चोर….

nirbhid swarajya

पालकमंत्र्यांनी स्वतः बाजारात जाऊन केली जनजागृती

nirbhid swarajya

सोयाबीन , कपाशीवर उंट अळीचा प्रादुर्भाव वाढला कृषी सहाय्यक यांची पाहणी

nirbhid swarajya
error: Content is protected !!