November 21, 2025
आरोग्य जिल्हा

जिल्ह्यात आज प्राप्त 38 कोरोना अहवाल ‘निगेटीव्ह’; तर 1 पॉझीटीव्ह

• 8 रूग्णांनी केली कोरोनावर मात, मिळाली सुट्टी

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 38 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हा पातुर्डा ता. संग्रामपूर येथील 66 वर्षीय पुरूष रूग्णाचा आहे.   तसेच आज 8 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना कोविड केअर सेंटर येथून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये खामगांव येथून मलकापूर येथील 45 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरूणी, 65 वर्षीय वृद्ध महिला व शेगांव येथील 30 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे. तसेच बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून मलकापूर येथील हनुमान चौक परीसरातील 55 वर्षीय महिला, भीमनगर मलकापूर येथील 62 वर्षीय पुरूष, 29 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे. अशाप्रकारे आज कोरोनावर मात करीत 8 रूग्णांनी घर गाठले आहे.   आतापर्यंत 95 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 95 आहे.  सध्या रूग्णालयात 43 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.   तसेच आतापर्यंत 1952 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 143 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी पाच मृत आहे.   तसेच आज 18 जुन रोजी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 1 पॉझीटीव्ह, तर 38 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  138 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1952 आहेत, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.


Related posts

‘सूर्यपुत्रा’ची कथा मोठ्या पडद्यावर

nirbhid swarajya

मकावर औषधी टाकतांना 5 जणांना विषबाधा;एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू,

nirbhid swarajya

महाराष्ट्रातुन गुजरातला गेलेले प्रकल्प परत आणा – राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी…

nirbhid swarajya
error: Content is protected !!