January 8, 2025
खामगाव

45 वर्षीय इसमाची विहिरित उडी घेऊन आत्महत्या

खामगांव : एका 45 वर्षीय इसमानी विहिरित उड़ी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघड़किस आली. येथील आईसाहेब मंगल कार्यालया जवळील स्थित कमलकिशोर मोहनलाल राका वय 45 हा 16 जून पासून घरून निघुन गेला होता. उशिरा पर्यन्त घरी न आल्याने  काल शिवाजी नगर पोलिस स्टेशन ला नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तर आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास जैन हॉस्पिटल जवळील विहिरित एक इसम मृतावस्तेथ पाण्यात तरंगताना नागरिकांना दिसून आला.याची माहिती मिळताच  पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.इसमास विहिरितुन बाहेर काढला होता. तर त्याच्या कपड्याच्या वर्णना वरुन तो कलमकिशोर राका असल्याचे समजले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन शवविच्छेदनास पाठविण्यात आला. मृतक कमलकिशोर हा हातगाड़ीवर कपङ्याचा व्यवसाय करत होता व त्याचा काही महिन्या अगोदर घटस्पोट झाला होता व लॉकडाऊन मुळे व्यवसाय बंद होता त्यामुळे मानसिक तनावात येऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. नातेवाईक हर्षद संजयकुमार राका यांनी शहर पोलिस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरुन जा.फो कलम 174 नुसार मर्ग दाखल करण्यात आला केला असुन पुढील तपास पोहेका गजानन जोशी, पोका शैलेश राजपूत करीत आहे.

Related posts

पोलिसांची वरली मटका वर धाड

nirbhid swarajya

भुखंड घोटाळ्यातील आरोपी विरूध्द आणखी दोन गुन्हे दाखल

nirbhid swarajya

शिवसेना व शिंदे गटात तुफान राडा ! बाजार समितीतील सेनेच्या कार्यक्रमात शिंदे समर्थकांचा हैदोस !!

nirbhid swarajya
error: Content is protected !!