January 7, 2025
आरोग्य खामगाव

जनुना येथील ते चार जण निगेटिव्ह

खामगाव : खामगाव तालुक्यातील जनुना येथील पती पत्नी व दोन मुले असे एकूण चार जणांचे स्वेब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जनुना येथील एका विवाहितेचा भाऊ अकोला येथून आला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण  असल्याची माहिती मिळाल्यावरून आरोग्य यंत्रणा 13 जून रोजी गावात दाखल झाली होती. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आला नाही तर त्यांच्या संपर्कातील त्याचे वडील मुलीच्या घरी आले होते त्यामुळे कोरोना चा संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून परिवारातील पती पत्नी व दोन मुलांचा 13 जून रोजी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते, दरम्यान 14 जून रोजी या चौघांचे नमुने निगेटिव्ह आले असल्याने परिसरातील नागरिकां चिंतामुक्त झाले आहे.

Related posts

किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेचे दहन सोमय्या पिता -पुत्रांना तत्काळ अटक करा

nirbhid swarajya

जिल्ह्यात आता रविवारलाच संचारबंदी

nirbhid swarajya

भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात घृणास्पद लिखाण करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा

nirbhid swarajya
error: Content is protected !!