November 20, 2025
विदर्भ

विदर्भात शेतकऱ्यांकडून बियाणांची खरेदी

कपाशी कडे कल जास्त

बुलडाणा : जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात आता पेरणीची तयारी सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीलाही सुरुवात केली आहे. यावर्षी शेतकऱ्यांचा कल हा कपाशी पिकाकडे जास्त असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे. यावर्षी चांगला पाऊस येणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्यामुळे तसेचकाल विदर्भात मान्सून दाखल झाल्याची घोषणा नागपूर वेधशाळेने केली आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करत पेरणी पूर्वीची मशागत पूर्ण केली आहे. अनेक शेतकरी बी-बियाणांच्या खरेदीसाठी दुकानात मोठी गर्दी करत आहे. खरीप हंगामातील इतर पिकांपेक्षा शासनाचे हमीभाव कापसाला चांगले असल्यामुळे व जिल्ह्यातील जमीन ही कपाशी पिकाला उपयुक्त असल्याने कपाशी कडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे. गेल्यावर्षी पावसाने कहर केल्याने खरिपाच्या पिकाची नासाडी झाल्यामुळे लागलेला खर्च वसूल झाला नव्हता, दरम्यान शेतकर्यांनी बी बियाणे आणून जुन्या अनुभवांना विसरून व कोरोनाला दूर सारत शेतकरी कामाला लागले आहे.

ReplyForward


Related posts

रिक्त असलेले उपविभागीय अधिकारी पद तातडीने भरा- धनंजय देशमुख यांची मागणी

nirbhid swarajya

जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये विद्यार्थी स्वयंप्रशासन व शिक्षकदिन साजरा…

nirbhid swarajya

नांदुरा जळगाव जामोद महामार्गावर भीषण अपघात…

nirbhid swarajya
error: Content is protected !!