April 19, 2025
संग्रामपूर

अस्वलाच्या हल्यामध्ये दोघांचा मृत्यू

संग्रामपुर : संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी येथील दोन इसमावर अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 11 जून रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्प , अकोट वन्यजीव विभाग अकोट मधील वनपरीक्षेत्र सोनाळा मधील खडकपाणी या ठिकाणी निमखेडी येथील दोन व्यक्ती वरती अस्वलाने हल्ला केल्याने दोघांचा जागीच मुत्यू झाला. अशोक मोतीराम गवते वय 52 व माणा बंडु गवते वय 42 वर्ष हे दोन्ही रा.निमखेडी तालुका संग्रामपुर येथील आहेत.अशोक गवते व माणा बंडू गवते हे दोघेही आपल्या सहकाऱ्यासोबत आपली गुरढोर शोधण्यासाठी सकाळी 7 वाजता गेले असता झाडामधे लपुन बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढवला,त्यांनी अस्वलाला हाकालण्या प्रयत्न केला परंतु हल्ल्यात जखमी झाल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला व माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले होते.

दुपारपर्यंत त्यांचे मृतदेह घटनास्थळी पडलेले होते. दुपारी 3:30 वाजता सदर घटनास्थळी वनरक्षक श्री ए.आर.तोटे व इतर कर्मचारी पोहचले असता दोन्ही व्यक्ती मृत झाल्याचे दिसुन आले . त्या दोन व्यक्तीच्या मृतदेहापासुन अंदाजे 15 ते 20 मिटर अंतरावरती सुमारे 6 ते 8 महीणन्याचे दोन अस्वलांची पिल्ले मरण पावल्याचे दिसुन आले व त्याचे अंगावरती कुर्हाडीने मारल्याच्या जख्मा दिसुन आल्या माहीती मिळताच घटनास्थळावरती पोलीस स्टेशन सोनाळा पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पवार ,सचिन राठोडआणि उपवनसंरक्षक , व मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अकोट हे दाखल झाले. दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात वरवट बकाल येथील शवविच्छेदन करण्यात आले आणि पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहे.

Related posts

पंचायत समिती कर्मचाऱ्याच्या चार चाकी वाहनाचा अपघात

nirbhid swarajya

कपाशी पीक जळाल्याने शंभर टक्के नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी…

nirbhid swarajya

अतीरुष्टि मुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाचे शेतकऱ्यांच्या बाधावर जाऊन पंचनामे करा स्वाभिमीनीची मागणी.

nirbhid swarajya
error: Content is protected !!