April 19, 2025
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वजारोहण करून वर्धापन दिन साजरा

मुंबई : आज दिनांक 10 जून रोजी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य पक्ष कार्यालयात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करुन प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वजारोहण करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यंदाच्या वर्धापन दिनाला कोरोना महामारी आणि निसर्ग चक्रीवादळाची पार्श्वभूमी असल्याने महाराष्ट्राला पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनी लोकसेवेसाठी समर्पित होण्याचा निर्धार करावा आणि रक्तदान शिबीरांचे आयोजन करुन गरज असलेल्या रुग्णांना मदत करावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ , खा.सुप्रिया सुळे , कामगार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे , गृहमंत्री ना.अनिल देशमुख, अल्पसंख्याक विकास मंत्री ना.नवाब मलिक, सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे , प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,माजी खासदार समीर भुजबळ आणि इतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts

प्रमोदजी मुळे भाजप तळागळातील सामान्यांचा पक्ष- सागरदादा फुंडकर

nirbhid swarajya

उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने पकडला 2 लाख 13 हजाराचा गुटखा; तीन आरोपी अटकेत

nirbhid swarajya

आर्मी भरती करणाऱ्या मुलांनी केले मैदान साफ

nirbhid swarajya
error: Content is protected !!