खामगांव : खामगाव येथील बसस्थानकातील सायकल स्टँड च्या संचालकाने चोरीच्या संशयावरून एकास झाडाला बांधून चोपल्याची घटना १ जून रोजी घडली होती.
या प्रकरणी शहर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सायकल स्टँड च्या संचालका विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. कैलास देवलाल वाघ 55 हा 1 जून रोजी बसस्थानक परिसरात भंगार वेचन्याचे काम करीत होता. दरम्यान बस स्थानकावरील पार्किंग स्टैंडचे ठेकेदार गणेश चौकसे यांनी कैलास वाघ यास चापटा बुक्यांनी मारहाण केली.
तसेच साडे तीन तास बांधून ठेऊन चोरी झालेले पैसे व साहित्य आम्हाला परत दे असे म्हणून कैलास वाघ यास सोडून दिले. याप्रकरणी कैलास वाघ याने शहर पोलिस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादिवरून आरोपी गणेश चौकसेविरुद्ध भादवी कलम 342,323 नुसार गुन्हा दाखल केला आहे.