November 20, 2025
खामगाव शेतकरी

खामगावात स्टॅम्प पेपरचा तुटवडा ; शेतकरी चिंतेत,

खामगाव : कर्जमाफी व कर्जनुतणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना स्टॅम्प पेपरचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी शंभर रूपयांचा स्टॅम्प घेण्यासाठी तासंतास रांगेत उभे आहेत. खामगाव येथील प्रशासकीय इमारतीला लागून असलेल्या गल्लीत स्टॅम्प पेपर घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी असतांना, त्याकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे. खामगावात चढ्या भावाने स्टॅम्प पेपरची विक्री व कृत्रिम तुटवडा होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे त्यामुळे बँकांची कामे देखील रखडली असून, ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना स्टॅम्प पेपरसाठी तीन-तीन तास पायपीट करावी लागत आहे. शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी आहे.

Related posts

चिंचपूर शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुकी मध्ये मुख्याध्यापकाची मनमानी…

nirbhid swarajya

एमआयडीसीत गुटखा पकडला

nirbhid swarajya

जलंब येथे रेतीची गाडी पकडली मांडवली करून सोडून दिली…

nirbhid swarajya
error: Content is protected !!