November 20, 2025
चिखली

वीज मंडळाच्या अभियंता व कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी

चिखली : काल ४ जून रोजी मलकापूर पांग्रा येथे जनमित्र अमोल उईके यांना डी.पी. मध्ये फ्युज टाकत असतांना तेथे  नवाजखा अयुबखा पठाण याने वाद घालून शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या गाडीचे नुकसान सदर बाब वितरण केंद्र प्रमुख अभियंता देवर यांना कळताच त्यांनी जवळील पोलीस स्टेशन साखरखेर्डा येथे माहिती दिल्याने पोलीसांनी नवाजखा अयुबखा पठाण याला अटक केली. त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास अमोल अंबादास उईके यांना डीपी वर नवाजखा अयुबखा पठाण हे डी.पी. चा नुकसान करत असल्याचे कळविले. त्यामुळे अभियंता देवर हे कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी नवाजखा अयुबखा पठाण यांनी अमोल अंबादास उईके सह सर्वांना धक्कामुक्की व शिवीगाळ करून लाईट चालू केल्यास जीवाने मारण्याची धमकी दिली. सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन ला देऊन आरोपी नवाजखा अयुबखा पाठन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.

ReplyForward

Related posts

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना न्यायालयाकडून फाशीची शिक्षा

nirbhid swarajya

श्री नवयुवक मानाच्या कावड यात्रा मंडळाच्या वतीने भाविकांकरीता २४ तास मोफत थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था…

nirbhid swarajya

चांदमारी येथे जुगारावर अडड्यावर धाड; चोर सोडून सन्यासाला फाशी

nirbhid swarajya
error: Content is protected !!