January 1, 2025
खामगाव

फीजिकल डीस्टन्ससिंग पाळत महिलांनी केले वटपुजन

खामगाव : वटसावित्रीच्या दिवशी महिला वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात यंदा सावित्रीची ही प्रार्थना केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी नव्हे तर करण्यापासून प्रत्येकाच्या बचावासाठी करण्याची वेळ आली आहे आज दिनांक 5 जून रोजी असलेल्या वटपौर्णिमे वर कोरोना ची छाया निर्माण झाली आहे त्यामुळे महिलांना पहिल्यांदाच फीजिकल डीस्टन्ससिंग चे पालन करून वटपौर्णिमेचे पूजन करावे लागले आहे.
आज शहरातील जोशी नगर भागातील कुलस्वामिनी अपार्टमेंट येथे महिलांनी मास्क लावून तसेच फिजिकल डीस्टन्ससिंग पाळत वडाचे पूजन केले. दरवर्षी आम्ही मोठ्या थाटात वटपुजन करत असतो मात्र यावर्षी कोरोना चे संकट असल्याने आम्ही फिजिकल डीस्टन्ससिंग पाळत वटपूजन केले आहे अशी माहिती उपस्थित महिलांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलतांना दिली आहे.

Related posts

ब्लॅक कॅफे कॉफी शॉप जनतेच्या सेवेत रुजू

nirbhid swarajya

वीज पडून एकाचा मृत्यु तर; एक जण गंभीर जखमी

nirbhid swarajya

108 रुगवाहिकेच्या चालकांचा मनमानी कारभार

nirbhid swarajya
error: Content is protected !!