April 19, 2025
खामगाव

खामगाव शहरात मान्सून पूर्व पावसाच्या सरी..

खामगाव : शहरात मंगळवारी रात्री मान्सूनपूर्व सरी कोसळल्या सुरुवात झाल्याने सात जून नंतर होत असलेला पावसाळा अगोदर सुरू झाल्याचा अनुभव खामगाव शहरवासीयांनी अनुभवला खामगाव शहरामध्ये रविवारी 31 मे रोजी वातावरणात बदल होऊन अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर मंगळवार सायंकाळी सहानंतर वातावरणात बदल होऊन सायंकाळी अगोदर तुरळक पावसाचे थेंब पडले होते.त्यानंतर रात्री नऊ ते साडे नऊच्या दरम्यान मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्यास प्रारंभ झाला होता.

जिल्ह्यात सात लाख 37 हजार हेक्‍टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन असून शेतकऱ्यांची पेरणीपूर्वी ची कामे करण्याची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात 31 मे रोजी बिन काळ सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर पावसाच्या सरी कोसळलेल्या यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात मान्सून सात ते आठ जून रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे मात्र रविवारपासून मान्सूनपूर्व पावसाने महाराष्ट्र हजेरी लावली आहे.

Related posts

जय किसान बाजार समिती मध्ये स्थानिक कामगारांना काम देण्यासाठी एसडीओना निवेदन

nirbhid swarajya

खामगाव चिंतामणी बाल शिवभक्तचे कावळ यात्रेचे आयोजन….

nirbhid swarajya

जिल्ह्यात आज प्राप्त 385 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 55 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!