April 11, 2025
अकोला विदर्भ

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू केली ‘रेडिओ वाहिनी’

तेल्हारा  : सध्या कोरोनामुळे सर्वत्र शाळा व महाविद्यालये बंद आहेत. तसेच आगामी काळातही लवकर शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड जवळील खंडाळा जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक तुलसीदास खिरोडकार  यांनी  रेडिओ खंडाळा वाहिनी सुरू केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. कोरोनामुळे शाळा व महाविद्यालये बंद असल्यामुळे केंद्र सरकारने ई- बूक तसेच वर्गनिहाय वाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्य शासनाच्यावतीने आँनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शाळांसोबतच शिक्षकही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. खंडाळा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तुलसीदास खिरोडकार यांनी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळातही शिक्षण देण्याकरिता चक्क रेडिओ सुरू केला आहे. त्याला रेडिओ खंडाळा नाव देण्यात आले असून  या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम शिकविण्यास सुरुवात केली आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गानुसार मोबाईलवर लिंक पाठविण्यात येत असून राज्यभर त्या लिंक प्रसारित करण्यात येत आहेत.ती लिंक ओपन केल्यावर विद्यार्थ्याला दररोजचा अभ्यासक्रम सोबतच बोधकथा, पाठ्यपुस्तकातील कविता गायन, उतारा वाचन ही विद्यार्थ्यांना ऐकविण्यात येतआहे.

अकोला येथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरू केली ‘रेडिओ वाहिनी'#Akola#Varsha_Gailead#Lockdown

Posted by Nirbhid Swarajya on Saturday, May 30, 2020

तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्याकरिता कोणता व्यायाम करावा, याचीही माहिती देण्यात येत आहे. आरोग्यविषयक सवयी,शैक्षणिक विचारांवर चर्चा,भाषिक संबोध, गणित ,विज्ञान या विषयावर या विविध क्षेत्रातील सूलभक रेडिओ प्रसारणात सहभाग घेत आहेत. पुस्तकातील पाठ, कविता,संगीतमय पाढे सादरीकरण करण्यात येत आहेत. शिक्षकांच्यावतीने सदर लिंक विद्यार्थ्यांच्या किंवा त्याच्या कुटूंबातील सदस्याच्या मोबाईलवर टाकण्यात येईल. राज्यातील इयत्ता 1 ते 8 चे विद्यार्थी सदर लिंक ओपन करून ऐकू शकतील.

Related posts

माजी मंत्री ॲयशोमती ठाकूर यांनी केला ७६च्या आणीबाणी काळातील जेलभरो आंदोलनात सहभागी विष्णू कानडे यांचा सत्कार…

nirbhid swarajya

केंद्रसरकार व्दारा सर्वसमावेशक व आत्म़निर्भर भारत घडविणारा अर्थसंकल्प़ सादर- आ.ॲड.आकाश फुंडकर

nirbhid swarajya

विद्यार्थ्यांना घरातूनच परीक्षा देता येईल यासाठी प्रयत्न – उदय सामंत

nirbhid swarajya
error: Content is protected !!