December 28, 2024
आरोग्य जिल्हा

आज प्राप्त १३ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा :  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी  आज  १३ अहवाल प्राप्त झाले आहेत. सर्व १३ अहवाल निगेटिव्ह आहेत. आतापर्यंत ८७४ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.  जिल्ह्यात एकूण ३६ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. मलकापूर पांग्रा ता. सिंदखेड राजा येथील ८ वर्षीय चिमुकलीला आज सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत २५ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २५ आहे.  सध्या रूग्णालयात ०८  कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.   तसेच आज २३ मे रोजी १३ अहवाल प्राप्त झाले आहेत. सर्व  १३ अहवाल निगेटिव्ह आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने १३३ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ८७४ आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 241 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 55 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

केंद्र सरकारकडून ध्वज संहितेमध्ये बदल; आता ‘या’ वेळातही तिरंगा फडकवता येणार

nirbhid swarajya

तांदूळाच्या काळाबाजाराची सीआयडी मार्फत चौकशी होणार –छगन भुजबळ

nirbhid swarajya
error: Content is protected !!