ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम
खामगांव : बुलडाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुगनांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी आणि सर्वसामान्यांची रोगप्रतिकारक शक्ति वाढवून कोरोना वर मात करण्यासाठी खामगांव तालुक्यातील पिंप्री गवळी येथे डॉ. प्रवीण गासे यांच्या सहकार्यातून होमिओपेथीक औषधिचे वाटप करण्यात आले आहे.
कोविड १९ या रोगापासून बचाव करण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा औषध तयार करण्यात आलेले नाही. हा रोग होऊ नये यासाठी सध्यातरी प्रतिकार शक्ती वाढवणे एवढा एकच मार्ग शिल्लक आहे यासाठी फॉस्टर डेव्हलपमेंट मेडिकल कॉलेजच्या वतीने अर्सनिक अल्बम १९ ही रोगप्रतिबंधक होमिओपॅथी औषध तयार करण्यात आली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने या औषधाला मान्यता दिलेली आहे. याच अनुषंगाने, पिंप्री गवळी येथील ग्रामपंचायत व गावातील नागरिकांच्या सहभागातुन ८०० कुटुंबांना या अर्सनिक अल्बम १९ या होमिओपेथीक औषधिचे वाटप करण्यात आले आहे.यासह गावात अनेक कोरोना प्रतिबंधक उपायोजना राबवण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील पिंप्री गवळी ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नागरिकांना होमिओपॅथिक गोळ्या वाटप करणारी ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.