December 14, 2025
खामगाव

खामगावात भारत कटपीस ते फरशी पर्यंतचे रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात

अनेक तक्रारी नंतर पुर्ण होत आहे शहरातील मुख्य रस्ता

खामगाव : ५ कोटी रुपयांच्या खर्चाचे खामगाव नगर पालिकेच्या हद्दीतील भारत कटपीस ते फरशी रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि रूंदीकरणाचे काम गेल्या कित्येक दिवसांपासुन अनेक अडचणीमुळे कासव गतीने सुरु होते. मात्र शासनाच्या सर्व मंजुरातीनंतर हे काम आता अंतिम टप्याकडे जात आहे. विशेष म्हणजे नेहमीच वर्दळीचा राहणारा रस्ता लॉकडाऊन मुळे पुर्णपणे रिकामा असल्याने कामाची गती वाढली आहे.

खामगाव नगर पालिका हद्दीतील भारत कटपीस ते फरशी रस्ता क्राँकीटीकरण आणि रूंदीकरणाचे काम जानेवारी २०१८ मध्ये सुरू झाले. मात्र, सुरूवातीपासूनच या कामात तक्रारी झाल्याने आणि प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहचल्याने रस्त्याचे काम चांगलेच रखडले होते. मात्र सर्व अडचणींवर मात करून हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या दीड महिन्यात हा रस्ता पुर्ण करून जनतेसाठी खुला करणार असल्याचा ठेकेदार अमोल अंधारे यांनी निर्भिड स्वराज्य सोबत सांगितले आहे

Related posts

नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना जीवंतपणी तात्‍काळ आर्थिक मदत द्यावी- मनसेची मागणी

nirbhid swarajya

मराठा आरक्षणासाठी उद्या डफडे बजाओ आंदोलन

nirbhid swarajya

स्व.संजयभाऊ ठाकरे पाटील यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..

nirbhid swarajya
error: Content is protected !!