शेतकऱ्यांचा माल विक्रीला खोळंबा
खामगाव : लोकलमध्ये शेतकऱ्यांचे मालक खरेदी-विक्री व्हावे यासाठी शासनाने बाजार समिती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार मागील काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी-विक्री सुरू आहे,मात्र बुधवारी अचानक पणे खामगाव येथील अडते आणि व्यापाऱ्यांनी संगनमत करून बाजार समिती अघोषित बंद पाडली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या विक्रीला खोळंबा निर्माण झाला असून बाजार समिती प्रशासनाने अघोषित बंद ठेवणाऱ्या 150 च्या जवळपास अडते व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडते व्यापाऱ्यांसाठी बाजार समिती सुरु झाल्या पासुन मास्क व सँनीटाइजर देण्याबाबत कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत असे आरोप करीत येथील अडते व्यापाऱ्यांनी गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज अघोषित बंद ठेवला यामुळे बाजार समितीमध्ये मध्ये विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा खोळंबा झाला तर दिवसभर त्यांना ताटकळत बसावे लागले.