December 29, 2024
बुलडाणा

आज प्राप्त २४ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी २४ अहवाल आज प्राप्त झाले असून सर्व २४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत ८२० रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच काल रात्री तीन पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णांसह जिल्ह्यात एकूण ३५ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत २४ कोरोनाबाधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या २४ आहे. सध्या रूग्णालयात ०८ रूग्ण कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज २१ मे रोजी २४ अहवाल प्राप्त झाले आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने ९४ आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ८२० आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.आर.जी पुरी यांनी दिली आहे.(जिमाका)

Related posts

जिल्ह्यात 2 उपविभागीय महसुल अधिकारी व 1 उपजिल्हा निवडनूक अधिकाऱ्याची बदली

nirbhid swarajya

खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्या

nirbhid swarajya

देहव्यापार करताना दोघांना अटक ; गुन्हा दाखल

nirbhid swarajya
error: Content is protected !!